राजधानी अडव्हेंचर रन चा उद्देश...
 

    मध्यमवर्गीय, सुखवस्तू कुटुंबातील मुले पालकांच्या वेळेअभावी दिवसातला फार कमी वेळ मैदानात घालवतात. त्यात आजकालच्या ट्रेंड प्रमाणे सुट्टीला गाड्यातून जवळचे प्रेक्षणीय स्थळ, सिनेमा, मॉल, आणि राहिलेला वेळ टीव्ही, कॉम्पुटर, मोबाइलला यात घालवतात. मुले म्हणजे जणू उत्सवाचा धबधबा ... एनर्जी लेवल जणू आकाशातली भिडलेली ... सळसळता उत्साह जणू फेसाळलेला समुद्रासारखा... हे आम्ही जाणले आणि मुलांना साद घातली ... सातारा... निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेल्या या शहरात सुद्धा काही मोजकी घरे सोडली तर परिस्थिती काही वेगळी नव्हती ... म्हणूनच मुलांनी आम्हला ओ दिली.