Social Programs
Participation on Varud Shramdan

varud  May 19,2019

  

नमस्कार सातारकर आपल्या सगळ्यांच्या प्रेमाने सहकार्याने, सहभागाने, मार्गदर्शनाने आपण वरुड या गावी ,दिनांक 19 मे रोजी पाणी फाऊंडेशनचे श्रमदान, फेसबुक सातारा तर्फे घेत आहोत ,सुरुवातीपासूनच सगळ्या सदस्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खुप मेहनत घेत आहेत.
   
    1) मुंबई पुणे वरून येणारे सातारकर त्यांनी सातारा बस स्थानक येथे पहाटे साडे पाच पर्यंत पोहोचायचे आहे, त्यानंतर ज्या ज्या लोकांनी आपल्याला कळवल आहे ,त्या लोकांची सोय सातारा ते वरूड, वरुड ते सातारा अशी गाड्यांचे नियोजन केले आहे ,त्यापोटी नाममात्र भाडे शंभर रुपये प्रत्येकाने स्वतःच्या तर्फे गाडीला द्यायचे आहेत . ज्यांना ज्यांना फ्रेश होऊन निघायचं आहे त्यांची सोय दीपक सरोदे नाना यांच्या फ्लॅटवर केली आहे.

2) कराड वरून विजय घोरपडे दादा तसेच उंब्रज चरेगाव येथील मंगेश साळुंखे हे स्वतःच्या गाडी घेऊन वरुड येथे दाखल होणार आहेत या दोन्ही गाड्या मध्ये  ,वीस लोक असतील .

3 ) फेसबुक सातारा साठी ज्यांनी नाममात्र दरात चारचाकी गाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत असे विजय दादा घोरपडे ,विजय दादा जाधव ,निलेश नावडकर, अक्षय सपकाळ ,अनिल दळवी साहेब, दीपक सरोदे नाना या सगळ्या मान्यवरांना खूप खूप धन्यवाद .

4)  फेसबुक सातारा च्या महा श्रमदानासाठी मुंबई, पुणे सिंधुदुर्ग ,देवगड ,बुलढाणा सोलापूर, सांगली अशा विविध भागातून सातारकर येणार आहेत.  

5) सजग फाउंडेशन सातारा ,सॅटर्डे क्लब सातारा, महाराष्ट्र-अंधश्रद्धा निर्मूल निर्मूलन समिती ,अशा विविध संघटनांनी आपल्या उपक्रमास पाठिंबा दर्शवून उपस्थिती असणार आहे. नागठाणे येथील प्रदिप दादा बर्गे यांच्या  सोबत स्वतःच्या गाडीसह 12 जलदुत असणार आहेत.

6) जवळपास अडीचशे कार्यकर्ते त्या ठिकाणी त्या ठिकाणी श्रमदानासाठी उपस्थित राहणार आहेत. श्रमदान सकाळी 7 ते सकाळी 10पर्यंत असणार आहे .

 7) श्रमदानाच्या ठिकाणी सकाळी सात वाजता कसलेही परिस्थितीत पोहोचायचे आहे ,त्यानंतर जे पहिले शंभर सातारकर उपस्थित राहतील त्या सगळ्यांना मोफत फेसबुक सातारा चे व पाणी फाउंडेशन चा लोगो असणारे टी-शर्ट मोफत दिला जाणार आहे.

8)सगळ्यांची उपस्थिती झाल्यानंतर 6 - 6  लोकांचे ग्रुप बनवणे व गावकऱ्यांनी जिथे जिथे मार्किंग केले आहे तेथील सिसिटी, एलबीएस ही काम हातात घ्यायला सुरुवात करायची आहे .सकाळी सात ते दहा या वेळेत श्रमदान असणार आहे .श्रमदानाचे वेळी कोणालाही इजा होणार नाही याची काळजी स्वतः घ्यायची आहे, जर आपणास कोणत्या गोळ्या औषधे चालू असतील तर न विसरता त्यासोबत आणावेत.

 9 )श्रमदान नंतर सगळ्यांनी नाष्टा व नाश्ता झाल्यानंतर थोडंसं हाऊजी या नावाचा गेम खेळला जाणार आहे यातील विजेत्यांना जवळपास 10 हजार रुपयांचे बक्षीस दिली जाणार आहेत ,तसेच 12 डझन हापूस आंबा ,पंधरा डझन केळी फळांचा वाटप कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर गावातील गावकरी पाणी फाउंडेशन तर्फे ज्या काही गेम खेळले जातात त्यामध्ये आपला सहभाग असणार आहे, यानंतर गावकऱ्यांच्या वतीने  जेवणाचा शाकाहारी आस्वाद घेतल्यानंतर ,आपल्या फेसबुक सातारा चा परिवार एकत्र बसून गप्पा गोष्टी तसेच भविष्यातील काही उपक्रम याच्यावर चर्चा नंतर हा कार्यक्रम संपेल व प्रत्येकांना आपापल्या मार्गाने आपापल्या ठिकाणी जायला निघायचं आहे .

11) श्रमदानाचे उपक्रमांमध्ये सगळ्यांनी सुरक्षित व सावकाश प्रवास करावा अति उत्साहामध्ये अनुचित घटना घडणार नाही याची काळजी घ्यावी .