Social Programs
फेसबुक  सातारा ने नांद्रे येथे जाऊन 120 घरात प्रत्यक्ष मदत केली ..

Satara  August 23,2019

  

विसरू नका ..

शेवटचे तीन दिवस 

गेले 12 दिवस आपल्याग्रुप मधील काही मेंबर्स अथक पूरग्रस्तांना मदत करीत आहेत .. कोणत्या ना कोणत्या माध्यमातून, ग्रुप मधून कार्यरत आहेत .. 

सुरवातीलाच मी एखाद्या ठिकाणी अमुकतमुक केलं हे मनात न ठेवता आपापल्या परीने हातभार लावत आहेत .. 

कालची गोष्ट .. आपल्या फेसबुक  सातारा ने नांद्रे येथे जाऊन 120 घरात प्रत्यक्ष मदत केली .. त्या गावातील नारळाची झाडे, लाईट चे खांब पूर्ण पाण्यात बुडले होते .. 

विचार करा .. काय अवस्था असेल आता .. अजून हि काही घरात चिखल आहे .. मुलांचे शैक्षणिक साहित्य , कपडे, सर्वकाही नष्ट झाले आहे.. एका घरातील कर्ता पुरुष तीन मुले , आणि आई ला वाचवताना दम लागल्याने डोळ्या समोर पाण्यात बुडला .. या घरात आपल्या मेंबर्स ना पण अश्रू आवरेना .. तिथेच जागेवरती 5000/- रुपये त्यांना मदत दिली .. व्हिडीओ सांगेल बरच काही ..

हि मदत तोकडी, अपुरी आहे .. 

या महापूरात लाखो मुलांचे नुकसान झालेले आहे ..

सकाळ आणि सजग फौंडेशन या मुलांना  शैक्षणिक साहित्य मदत्तस्वरूपात देण्यासाठी प्रयत्नशील आहे ..

मेंबर्स आर्थिक किंवा वस्तुरूपात मदत करू शकतात .. 

कृपया मदत करा 

Team Sajag Foundation 

Satara