Social Programs
सातारा जिल्ह्यात नाताळ ची सुट्टी रद्द करून गणपतीमध्ये सलग पाच दिवस सुट्टी द्यावी

Mumbai  August 22,2019

  

सातारा जिल्ह्यात नाताळ ची सुट्टी रद्द करून गणपतीमध्ये सलग पाच दिवस सुट्टी द्यावी यासाठी मा. आशिष शेलार, शालेय शिक्षण मंत्री यांचेकडे सजग फौंडेशन, हॅप्पी पीपल्स तर्फे आग्रह धरला.

साहेब तुम्ही मुंबई मध्ये गणपतीची पाच दिवस सुट्टी चा आदेश दिलात तसाच आदेश सातारा जिल्ह्यात लागू करावा .. शेलार सरांनी पत्र वाचताच नक्कीच करूया .. आपली संस्कृती जपण्यासाठी तुम्ही मुंबई पर्यंत आलात तर मी का नाही सपोर्ट करणार ?

मुलांसाठी , शालेय शिक्षण मधील अडचणींसाठी कधीही हक्काने या .. मी नक्की सहाय्य करेन असे सांगत भरपूर गप्पा मारल्या ..

सजग फौंडेशन मुलांसाठी करत असलेल्या कार्याबद्दल त्यांनी विशेष कौतुक करत मला पण तुमच्या एखाद्या उपक्रमात सामील होण्यास आवडेल असे आवर्जून सांगितले.

गणपती बाप्पा मोरया ...

प्रशांत मोदी (लाटकर)..सजग फौंडेशन

अजय गायकवाड .. अध्यक्ष .. हॅपी पीपल्स

फोटो साभार .. उत्तम सूर्यवंशी