आजकालचे युग संगणकाचे आहे कॉम्पुटर , मोबाईल, विडिओ गेम्स इंटरनेट यातच आपली युवा पिढी अडकत आहे. असे चित्र काही दिवसापर्यंत होते, आत युवा पिढी बरोबरच लहान मुले सुद्धा यात अडकू लागल्याची परिस्थिती आहे. तीन वर्षांपूर्वी सजग पॅरेंटस  ग्रुप अस्तित्वात आला. आणि तो हि इंटरनेट च्या मोहजाळात अडकलेल्या लहानग्यांना  बाहेर काढण्यासाठी, त्यांचे बालपण मुक्तपणे जगू देण्यासाठी, रोजचे व्यवहार, सामाजिक भान, आपली संस्कृती जोपासणे या गोष्टी मुलांमध्ये रुजवण्यासाठी ह्या ग्रुप मधील पॅरेंट धडपडू लागला, मेहनत घेऊ लागला  आज प्रत्येक पालकाला वाटते कि माझे लहानपण सुंदर होते.पण आता ह्या पिढीला ते मिळत नाही. हाच धागा सजग फौंडेशन ने काम करण्यास सुरुवात केली आहे. माझ्यासारखेच लहानपण फक्त माझ्याच मुलाने नाही ते प्रत्येक मुलाने जगावे यासाठी आम्ही काय करू लागतो, फक्त चर्चा करत न बसता प्रत्यक्ष कृती मध्ये आणत आहोत.